कार्यालय वेळ: स. 09:45 - सायं 05:45

ग्रामपंचायत माजळ

तालुका :लांजा , जिल्हा : रत्नागिरी

“गावाचा इतिहास — काळाच्या प्रवाहातील अमूल्य ठेवा”

माजळ हे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील ऐतिहासिक व निसर्गसंपन्न गाव आहे.गावाची स्थापना अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाली असे मानले जाते.दलपतसिंग हिंमतसिंग गिरासे (दलपत दाजी) यांनी गावाच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान दिले.रणसिंग दाजी, फकरा दाजी, केसरा दाजी, हिंमता दाजी, गुलाबा दाजी, बहादूर दाजी, रत्ना दाजी आणि रामसिंग दाजी या महान व्यक्तींनी गावाच्या विकासासाठी परिश्रम घेतले.गावाच्या सुरुवातीच्या काळात शेती […]

माजळ गावचा प्रवास: संघर्षातून समृद्धीकडे

“सरपंच आपल्या दारी ,योजना कल्याणकारी” या उपक्रमांतर्गत गावातील नागरिकांना विविध योजनांची माहिती, कागदपत्रे यांचे वाटप करण्यात. नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या जातात.

ग्रामीण विकासात ग्रामपंचायतीची भूमिका

ग्रामीण विकासात ग्रामपंचायतीची भूमिकामाजळ ग्रामपंचायत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. विषमुक्त शेती करण्यासाठी सप्त संपादनावर काम सुरू झाले आहे. जल ,जमीन, जंगल, जनावर, जन ( मनुष्य) शिक्षण,स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सातत्याने प्रगती साधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. लोकसहभाग आणि पारदर्शक प्रशासन हीच आमची ताकद आहे.

स्वच्छ गाव, सुंदर गाव – स्वच्छता अभियान

स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न ग्रामपंचायतीतर्फे गावात दर आठवड्याला स्वच्छता मोहिम राबवली जाते. ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत, प्रत्येक घरातून कचरा वेगळा गोळा करण्याची योजना यशस्वीपणे राबवली जात आहे.

शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

माजळ गावातील शेतकरी आता ड्रिप सिंचन, सेंद्रिय खत आणि आधुनिक उपकरणांचा वापर करून शेतीत चांगले उत्पन्न मिळवत आहेत. ग्रामपंचायत आणि कृषी विभागाच्या सहकार्याने शेतकऱ्यांना नवनवीन प्रशिक्षण दिले जात आहे. एकेकाळी पूर्णतः कोरडवाहू शेती असलेला आमचं वाडी गाव आज  गावातील 70 ते 80 टक्के शेतकरी फळबाग ची शेती करतात.

शिक्षणाचा विकास आणि बालकांचे भविष्य

ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने शाळांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, डिजिटल शिक्षण साधने आणि मुलींसाठी विशेष उपक्रम राबवले जात आहेत. शिक्षणाद्वारेच गावाचा खरा विकास साधता येतो, असा आमचा विश्वास आहे.

जलसंवर्धन – पाण्यासाठी आज आणि उद्या

गावाच्या विकासात जळसाैवर्धन (जलसंपदा संवर्धन) खूप महत्त्वाचे आहे.माजळ गावात पावसाच्या पाण्याचा संवर्धन करण्यासाठी विविध उपाय राबवले गेले आहेत.पाण्याचा शाश्वत वापर करण्यासाठी गावात पाणीसाठा जलधारक तळे, कुंड आणि भरणगड बांधण्याची योजना सुरू आहे.ह्या तळ्यांमुळे पावसाचे पाणी जमिनीखाली साठते व भूजल पातळी वाढते.शेतीसाठी पाण्याचा पुरवठा अधिक सुनिश्चित होतो व पिके चांगले वाढतात.ग्रामीण भागातील पाण्याच्या हंगामावर अवलंबून राहण्याची […]